

Pune Crime News: पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये १ नोव्हेंबर रोजी गणेश काळे याची हत्या करण्यात आली. या हत्येचा थेट संबंध आंदेकर टोळीशी असल्याचं पोलिस तपासामध्ये पुढे आलेलं आहे. मयत गणेश काळेच्या वडिलांनीच आंदेकर टोळीविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील मुख्य चारही आरोपींवर यापूर्वी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.