Pune Kondhwa Ganja Raid : कोंढव्यात गांजा विक्रीवर पोलिसांचा मोठा छापा; २ विक्रेत्यांसह ४३ ग्राहक ताब्यात, २.५ किलो गांजा जप्त

Pune Police : पुण्यातील कोंढवा परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाने गांजा विक्रीविरोधात मोठी कारवाई केली. पोलिसांनी गणेश पाटोळे आणि आजू अहमद शेख या दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडून पोलिसांनी सुमारे अडीच किलो गांजा जप्त केला.
Pune ganja raid

Pune Kondhwa ganja raid

esakal

Updated on: 

Pune Kondhwa Ganja Raid, Police Take Major Action : पुण्यातील कोंढवा परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल अडीच किलो गांजा जप्त केला. विशेष म्हणजे, गांजा खरेदी करण्यासाठी घटनास्थळी आलेल्या तब्बल ४३ जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com