

Ministerial Meet on Kothrud Crime
Sakal
पुणे : "कोथरूड परिसरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. गुन्हेगारांना आमचा कोणताही पाठींबा नाही. उलट अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करा, आम्ही पूर्ण सहकार्य करू,” असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.