
कोथरूड येथील स्वामी विवेकानंद चौकात असलेल्या गोल्डन बेकरी’ला गुरवार (ता.७) पहाटे अचानक आग लागली. आगीत बेकरीचे अतोनात नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच कोथरूड, एरंडवणे, वारजे, एनडीए येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.