

Pune Kothrud Machete Attack: Amit Shinde Seriously Injured, Police Probe Underway
esakal
पुण्यातील कोथरूड परिसरात एका तरुणावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात अमित शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.