Pune police controversy : पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात पोलिसांनी तीन तरुणाींचा छळ केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पीडित तरुणींनी केली आहे. मात्र, याप्रकरणी अद्यात कोणताही गु्न्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे वंचितचे नेते सुजात आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार मध्यरात्री पोलीस ठाण्यात दाखल झाले. तसेच या प्रकरणी पोलिसांना जाब विचारला.