

Pune Fraud Case
Sakal
पुणे : दुर्धर विकाराने ग्रासलेल्या मुलींचे आजारपण दूर करण्याचे आमिष दाखवून कोथरूडमधील एका संगणक अभियंता आणि त्यांच्या पत्नीची १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपींनी जोडप्याकडून उकळलेले पैसे ३० दिवसांत परत करण्याची हमी (पुरशीस) न्यायालयात सादर केली आहे.