कोथरुड : बिगारी कामगारांच्या चार झोपड्यांना आग; जिवीतहानी नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

कोथरुड : बिगारी कामगारांच्या चार झोपड्यांना आग; जिवीतहानी नाही

कोथरुड : डहाणूकर कॉलनीमधील लक्ष्मीनगर येथे सकाळी अकराच्या सुमारास आग लागली यामध्ये चार झोपड्या जळाल्या. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. लक्ष्मीनगर येथे राहणारे बिगारी कामगार गोपाळ किसन खाटरावत यांच्या घरातून धुर निघत असल्याचे पाहून कमल राठोड यांनी लोकांना मदतीसाठी आवाज दिला. लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे जवान तातडीने येवून आग विझवली.

यामध्ये खाटरावत यांचे घर तसेच गोपाळ शंकर राठोड यांचेही घराचं अर्धा भाग जळाला आहे, तसेच शेजारील दोन घरांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. खाटरावत व राटोड यांच्या घरातील कपडे, रोख रक्कम व चीजवस्तू जळून खाक झाल्या. आग कशाने लागली हे समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे तांडेल लिपाणे, बाबू शितकल, अमोल पवार, दिपक पाटील, योगेश चव्हाण, चालक शिळीमकर यांनी आग विझवली.

Web Title: Pune Kothrud Worker Home Fire Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top