Pune Koyta Gang Video : पाच कोयते, आठ जण; थरार सीसीटिव्हीत कैद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

koyta Gang

Pune Koyta Gang Video : पाच कोयते, आठ जण; थरार सीसीटिव्हीत कैद!

Pune Koyta Gang Video : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली आहे.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Gang War In Pune : महिनाभरातील 'या' गुन्हेगारी घटनांनी वाढवलं पुणेकरांचे टेन्शन

अनेक घटनांमध्ये पोलिसांनी या गँगच्या काही सदस्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कोयता गँगच्या वाढत्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, शहरात पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, किरकोळ वादातून नववर्षाच्या पहिल्या दिवशी कोयता गँगने हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र, कट प्रत्यक्षात येण्यापूर्वीच पोलिसांनी या टोळीतील पाच जणांना अटक केली.

हेही वाचा: Pune Koyta Gang: कोयता गँग गुंडाची पोलिसांनी अटक करत काढली धिंड

मात्र, आता अटक करण्यापूर्वी या गँगचा हातात कोयते घेऊन निघाल्याचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही गँग एका किरकोळ कारणावरून कोणा व्यक्तीवर हल्ला करण्याच्या तयारी होती.

परंतु, त्यापूर्वी पोलिसांनी या टोळीतील पाच जणांच्या मुसक्या आवळल्याने संभव्य घटना टळली गेली. त्यानंतर आता हल्लापूर्वी हातात कोयते घेऊन निघालेल्या टोळीचा अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.

हेही वाचा: Koyta Gang: हिवाळी अधिवेशनात Ajit Pawar यांनी मांडलेल्या कोयता गँगची खरंच दहशत आहे?

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जानेवारी रोजी काही तरुणांची आपापसात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा मनात राग ठेऊन या आरोपींनी नवावाडा य ठिकाणी जाऊन हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर सीसीटीव्हीच्या साह्यायाने पोलिसांनी गगन मिशन (१९), अमन खान (२२), अर्सालान तांबोळी (२७), मंगेश चव्हाण (२४), गणेश पवार (२४) अशा पाच जणांना अटक केली.

हेही वाचा: Pune Koyta Gang: भर बाजारात दहशत माजवण्याचा प्रयत्न, कोयता हातात घेऊन फिरत होता

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात अनेक तरुण हातात कोयता घेऊन सर्रास दहशत निर्माण करत आहेत. शहरातील अनेक मध्यवर्ती तसेच उपनगर भागात अनेक तरुण कोयता घेऊन फिरत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.