

Justice Served After 17-Year Legal Battle
Sakal
पुणे : सरकारी प्रकल्पात जमीन संपादित झाल्यानंतर वाढीव भरपाईसाठी दावा दाखल केलेल्या मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला तब्बल १७ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर न्याय मिळाला आहे. जमिनी व फळझाडांसाठीची भरपाई वाढवून सहा लाख १८ हजार ४३९ रुपये तसेच भूमिसंपादन कायद्यानुसार सर्व हक्काचे लाभ देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायाधीश व्ही. आर. दसारी यांनी हा निकाल दिला.