Land Acquisition
Sakal
पुणे
Pune News : भूसंपादन ज्याचे, जबाबदारीही त्याच विभागाची, राज्य सरकारचा आदेश; जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा
Land Acquisition : राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, भूसंपादनानंतर न्यायालयीन आणि प्रशासकीय जबाबदारी संबंधित खात्यांवर सोपवण्यात आली आहे.
पुणे : ज्या प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन संपादित जमिनीचा ताबा संबंधित विभागाकडे सुपूर्त करण्यात आला आहे, अशा प्रकरणात प्रशासकीय, न्यायालयीन, विधानमंडळ विषयक बाबींची जबाबदारी त्या विभागांची राहील, असा स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार आहे.

