Pune Land Scam : ताथवडे जमीन प्रकरण; रामा ग्रुपसह १९ जणांवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime : ताथवडे परिसरातील ऐतिहासिक जमिनीवर बनावट दावे करून गुंडांच्या मदतीने बळकावण्याचा प्रयत्न करत सॉफ्टवेअर कंपनीला मोठ्या आर्थिक फसवणुकीचा फास लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
Pune Land Scam

Pune Land Scam

Sakal

Updated on

पुणे : मावळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना त्या भूखंडांवर ताबा मिळवण्यासाठी टोळ्यांचा वापर केला जात असल्याचे पुन्हा एकदा धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. ताथवडे येथील ३६ हेक्टर जमिनीच्या वादातून सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी कुख्यात रामा ग्रुपचे मोती पंजाबी यांच्यासह १९ जणांवर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वतः पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुन्ह्याकडे लक्ष घालून, मान्यता दिल्यानंतरच कारवाई सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com