Pune Airport Conducts Emergency Blackout Drill : शनिवारी पुणे विमानतळावर अचानक मॉकड्रील करण्यात आली. रात्री ८.२५ ते ८.४५ या दरम्यान हा सराव पार पडला. यावेळी जवळपास २० मिनिटं वीज पुरवठा खंडीत होता, म्हणजेच ब्लॅकआऊट करण्यात आला होता. तसेच विमानांनाही हवेत घिरट्या घालण्याचे राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने प्रवाशांमध्येही गोंधळाचं वातारवण निर्माण झालं होतं.