
Metropolitan Surveillance Unit Set to Detect and Control Epidemics Early
Sakal
पुणे : शहराच्या कानाकोपऱ्यात अचानक एखाद्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे आढळल्यास, त्या आजाराचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये वेगळी असल्यास तत्काळ नमुने गोळा करून त्यांची सखोल तपासणी आणि विश्लेषण करण्यात येईल. केवळ आजार ओळखण्यापुरतेच मर्यादित न राहता, त्याची कारणे शोधून दुसऱ्या भागात हा आजार पसरण्यापासून रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यात येतील. महापालिकेच्या आरोग्य विभागाने अशा तत्पर आणि समन्वित यंत्रणेची स्थापना करून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण सुनिश्चित केले आहे.