Pune : बिबट्याचा वावर सीसीटिव्ही मध्ये कैद

अठवड्यात एक वासरु,शेळी व 2 कुत्र्यांना केले फस्त,पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी.
बिबट्या
बिबट्याsakal

नसरापूर : भोर येथील डोंगरवस्ती परिसरात बिबट्याचा वावर असुन येथील गिरहे वस्ती भागातील एका फार्महाऊसच्या सीसीटिव्ही मध्ये हा बिबट्या दिसला आहे आठवडा भरात या बिबट्याने एक वासरु,एक शेळी व दोन कुत्री फस्त केली असल्याची माहीती ग्रामस्थांनी दिली असुन भयभीत ग्रामस्थांनी या भागात पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.

कांबरे खेडे बारे गावच्या डोंगरवस्ती मधील यादव वस्ती,गिरहे वस्ती भागात या बिवट्या वावर असुन ता. 12 आक्टोंबर रोजी गिरहे वस्ती वरील अभ्यंकर फार्म हाऊस मध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याने येऊन तेथील एक कुत्र्याचे पिल्लु तोंडात धरुन पळताना सीसीटिव्ही मध्ये चित्रित झाले आहे यामुळे या भागात बिबट्या वावरत असल्याचे निश्चित झाले असुन त्या नंतर दोनच दिवसात ता.15 रोजी यादव वस्ती येथे सुरेखा शिवाजी यादव यांची शेळीला बिबट्याने मारले व सायंकाळी पुन्हा येऊन मारलेली शेळी घेऊन गेला आहे या नंतर ता.16 पासुन यादववस्ती मधील दिनकर यादव यांचे वासरु बेपत्ता आहे तसेच साहेबराव चव्हाण यांचे कुत्र देखिल गायब झाले या वासरु व कुत्र्याला सुध्दा बिबट्याने मारले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कांबरे चे माजी सरपंच रामदास यादव,दादा शेलार,कैलास मोहीते,सुनिल यादव आदी ग्रामस्थांनी या बाबत वनपरिक्षेत्र कार्यालयात भेट देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची तसेच पाळीव जनावरे मारल्या बाबत शेतकरयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे

या बाबत नसरापूर वनपरिक्षेत्र अधिकारी संग्राम जाधव यांच्याशी संपर्क साधला असता कांबरे भागात बिबट्या अढळल्याचे तसेच सीसीटिव्ही मध्ये चित्रित झाला असुन या परिसरातील वनखात्याच्यावतीने वनपाल नितीन खरात व वनरक्षक अश्विनी देशमुख,अर्चना कोरके व कर्मचारी रात्रीची गस्त घालत असुन असुन नागरीकांना देखिल रात्रीचे बाहेर न पडता घरातील पाळीव जनावरे बंदिस्त ठिकाणी बांधावीत घराच्या आसपास बिबट्या दिसल्यास आरडोओरड करुन हुसकावे व सतर्क राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे ग्रामस्थांच्या पिंजरा लावण्याच्या मागणी बाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात येऊन निर्णय घेण्यात येईल असे जाधव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com