पुणे : थकबाकीदारांना दणका : एक लाख जणांचा वीजपुरवठा खंडित

कारवाईला सुरुवात; एक लाख जणांचा वीजपुरवठा खंडित
Mahavitran
MahavitranSakal

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील २२ लाख ४६ हजार अकृषक वीजग्राहकांकडे तब्बल २ हजार ५०३ कोटी १७ लाखांची वीजबिलांची थकबाकी आहे. दरम्यान, महावितरणकडून थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली असून, पंधरा दिवसांत १ लाख ३ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा इतर अकृषक वर्गवारीतील २२ लाख ४५ हजार ९०० ग्राहकांकडे २ हजार ५०३ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात (कंसात थकबाकी) पुणे जिल्हा १० लाख ३६ हजार ६०० (१०४५ कोटी), सातारा जिल्हा २ लाख २२ हजार ६०० (२६२ कोटी), सोलापूर जिल्हा ३ लाख ३६ हजार ९०० (६६५ कोटी), सांगली जिल्हा २ लाख ७६ हजार ९५० (२२६ कोटी) आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार ७६० ग्राहकांकडे ३०५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

Mahavitran
पुणे : दुधाला प्रतिलिटर १ रुपया बोनस

वारंवार आवाहन करूनदेखील थकबाकी न भरल्यामुळे महावितरणने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात पुणे जिल्ह्यात ६० हजार २६०, सातारा जिल्हा ४७९०, सोलापूर ९६३१, कोल्हापूर १९ हजार ५२८ आणि सांगली जिल्ह्यातील ९३१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरू करण्यात आली आहे. तसेच सायंकाळनंतरदेखील ही तपासणी करण्यात येत आहे. या दोघांमध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com