Pune : लोन अ‍ॅपच्या माध्यमातून १३ लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Crime

Pune : लोन अ‍ॅपच्या माध्यमातून १३ लाखांचा गंडा

पुणे : स्वप्नील हनुमंत नागटिळक (वय २९,रा.विजापूर रोड, सोलापूर) आणि श्रीकृष्ण भिमन्ना गायकवाड (वय २६,त्रिवेणीनगर, भेकराईनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत विजय प्रभाकर देवरे (वय ३०, रा.शिवशाही अपार्टमेंट, दत्तनगर चौक, आंबेगाव) यांनी फिर्याद दिली होती. १ सप्टेंबर २०२१ ते २ जून २०२२ दरम्यान हा प्रकार घडला.

१ सप्टेंबर २०२१ ते १२ जुलै २०२२ च्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने कॅश अडव्हान्स व स्मॉल लोन हे अप्लिकेशन गुगल प्लेस्टोअरवर ठेवुन ते अ‍ॅप्लिकेशन फिर्यादीला त्यांच्या मोबाईलवर ओपन करयाला सांगितले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलध्ये अनधिकृतरित्या दाखल झाले. पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली फिर्यादीकडून वेळोवेळी खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यांच्या संपर्कातील लोकांना अश्लील व बदनाकीकारक मेसेज व्हायरल केले.

तसेच जिवे मारण्यची धमकी देऊन फिर्यादीकडून तब्बल १३ लाख ८७ हजारांची खंडणी उकळली. दोन्ही अटक आरोपींनी एकमेकांशी संगणमत करून वाघोली, खराडी, हडपसर भागातील मजुरांना गोळा करून त्यांना कामाचे व पैशाचे आमिष दाखवले. त्यांच्या नावाने विविध बँकेत चालू आणि बचत खाते उघडले.

त्या अकाऊंटला अटक आरोपी यांचे साथीदार जो मोबाईल नंबर व इमेल आयडी सांगत ती सर्व माहती आपल्याकडे घेत आंतराष्ट्रीय स्तरावरील लोण अ‍ॅपचा गुन्हा करणार्‍या टोळीस माहिती पुरविल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच मजूरांच्या नावाने विविध बँकेत खाते उघडले. नंतर फसवणूक केलेली रक्कम त्यांच्या खात्यात पाठवली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिनल पाटील करत आहे.

Web Title: Pune Loan App Fraud 13 Lakhs Two Arrested By Cyber Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..