esakal | सिंहगड रस्ता परिसरातील हॉटेल चालकाचा खून; हल्लेखोरांनी कोयत्याने केले वार!
sakal

बोलून बातमी शोधा

Crime-Murder

लॉकडाऊनमुळे लांगोरे यांचे हॉटेलही बंद होते. तरीही ते शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या नऱ्हे येथील हॉटेलच्या परिसरात थांबले होते.

सिंहगड रस्ता परिसरातील हॉटेल चालकाचा खून; हल्लेखोरांनी कोयत्याने केले वार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे येथे एका हॉटेल चालकाचा अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवारी (ता.१२) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- ...अन् तरीही रक्तदान करत पोलिस पुन्हा एकदा समाजासाठी धावून आले!

सुनील लांगोरे (वय 40, रा. नांदोशी, खडकवासला) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांगोरे यांचे नऱ्हे येथील सिद्धीविनायक क्रांती पार्कजवळ स्वराज रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. याबरोबरच शिवराज एंटरप्रायजेस नावाचे त्यांचा गॅस सिलिंडर वितरण करण्याचाही व्यवसाय आहे.

- इंजिनिअर तरुणाने शेतीचा नाद केला, लॉकडाउनमध्ये कमावले 13 लाख

लॉकडाऊनमुळे लांगोरे यांचे हॉटेलही बंद होते. तरीही ते शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या नऱ्हे येथील हॉटेलच्या परिसरात थांबले होते. त्यावेळी काही अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी लांगोरे यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्यांच्या डोक्‍यावर, तोंडावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी तेथून पळून गेले. 

- वीज कंत्राटी कामगारांचा एल्गार; दिला बेमुदत आंदोलनाचा इशारा!

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण, सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ताकवले यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोचले. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला, याचा उलगडा पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

आणखी वाचा - दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत राज्य शिक्षण मंडळाने दिले स्पष्टीकरण; निकालाच्या तारखा...!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

loading image
go to top