esakal | पुणेकरांनो, उद्या दिवसभर दुकाने खुली राहणार, मात्र...
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Shopkeeper

शहरातील अनेक भागात सोमवारी दुकाने बंद असतात. परंतु उद्याचा सोमवार मात्र त्याला अपवाद राहणार आहे.

पुणेकरांनो, उद्या दिवसभर दुकाने खुली राहणार, मात्र...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्या (सोमवार) रात्री बारा वाजल्यापासून पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यामुळे उद्याचा एक दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत दुकाने उघडी राहणार असल्यामुळे नागरिकांना खरेदीची संधी मिळणार आहे. मात्र मंगळवार सकाळपासून पुन्हा दुकाने बंद राहणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

'राजभवनात कोरोना, अमिताभजींना कोरोना' असं म्हणत सामंतांनी UGCला लावला टोला!​

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गरज लक्षात घेऊन त्याला चार वेळा मुदत वाढ देण्यात आली. मात्र गेल्या महिन्यात राज्य सरकार आणि पुणे महापालिकेकडून लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता. त्यामुळे तीन महिन्यांहून अधिक काळ ठप्प पडलेली बाजारात पुन्हा गर्दी वाढू लागली होती. सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले होते.

ग्राहकांनो, वीजबिल ऑनलाइन माध्यमांद्वारे भरा; महावितरणने का केलं असं आवाहन?​

असे असताना दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुन्हा दहा दिवसांचा पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवार (ता.१३) रात्री बारापासून त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. हा लॉकडाऊन २३ जुलै रात्री बारापर्यंत असणार आहे. 

अरे देवा! लाॅकडाऊन उठला पुणेकरांच्या मुळावर; जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडवले​

दरम्यान उद्या म्हणजे सोमवारी दिवसभर सर्व दुकाने खुली राहणार आहेत. शहरातील अनेक भागात सोमवारी दुकाने बंद असतात. परंतु उद्याचा सोमवार मात्र त्याला अपवाद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्‍यक त्या आणि गरजेच्या वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लक्ष्मी रस्त्यावरील दुकाने दर सोमवारी बंद असतात. परंतु या सोमवारी ग्राहकांच्या सोयीसाठी दुकान उघडी ठेवण्यात येणार आहे. 
- गिरीश जोशी ( व्यवस्थापक, योशा सिल्क, लक्ष्मी रस्ता) 

रविवार पेठ आणि परिसरातील दुकाने उद्या सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत नागरिकांना खरेदीसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत. 
- सुरेश जैन, व्यापारी

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image