Video : पुण्यातील कामगारांना दिलासा, लॉकडाउनमध्ये बाईकवरून जाण्यास परवानगी

pune lockdown workers get permission for travel on bike
pune lockdown workers get permission for travel on bike
Updated on

पुणे : शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील उद्योगांत काम करणाऱ्या अधिकारी, कामगारांना दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याचे सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांत काम करणाऱ्या लाखो कामगारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात 14 ते 23 जुलै दरम्यान लॉकडाउन होणार आहे. त्यात उद्योग काही प्रमाणात सुरू राहतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. कामगार बस किंवा मोटारीतून कामावर जाऊ शकतील, असे प्रशासनाने म्हटले होते. परंतु, ज्या उद्योगांकडे बस किंवा मोटारी नाहीत तेथील कामगारांची अडचण झाली होती. त्यामुळे दुचाकीवरून कामगारांना कामावर जाण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच त्यासाठी उद्योग, उद्योग संस्था, कामगार संघटना आग्रही होत्या. या पार्श्वकभूमीवर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. त्यात दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.

घरातून दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी संबंधित कामगाराला तो काम करीत असलेल्या कंपनीतील मनुष्यबळ विभागाकडून (एचआर) कामावर उपस्थित राहण्यास आवश्य क असल्याचे पत्र घ्यावे लागेल. तसेच कंपनीचे ओळखपत्र जवळ बाळगावे लागेल. कंपनीचे पत्र खिशात ठेवून कामगार त्याच्या दुचाकीवरून एकटाच कामाच्या ठिकाणी जाऊ शकेल. त्यामुळे धनकवडीत राहणारा कामगार भोसरीत तो काम करीत असलेल्या कंपनीतही पोहचू शकेल, असे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी स्पष्ट केले. वाटेत पोलिसांनी अडविल्यास त्यांना कंपनीने दिलेले पत्र आणि कंपनीचे ओळखपत्र दाखवायचे आहे. त्याच्या आधारे त्याला दुचाकीवरून प्रवास करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे, शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात सुमारे 1 लाख 3 हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत. मोठ्या कंपन्यांचाही त्यात समावेश आहे. या उद्योगांमध्ये एरवी सुमारे 17 लाख कामगार करतात. सध्या हे उद्योग सुमारे 40 टक्के क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे 70 हजार उद्योग सध्या सुरू आहेत. त्यात 7 लाख कामगार काम करतात. या उद्योगांमध्ये सूक्ष्म उद्योगांचे प्रमाण सर्वाधिक आहे. लॉकडाउनच्या काळात कामावर जाण्यासाठी बहुसंख्य कामगारांकडे दुचाकी हेच साधन आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा त्यांनाही मिळणार आहे. कामगारांच्या वाहनांना पेट्रोलही पुरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पहिल्या लॉकडाउनच्या काळात उद्योग सुमारे तीन महिने बंद राहिले होते. त्यामुळे उद्योग क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले होते. कामगारांचेही आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे लॉकडाउनमध्ये आता उद्योग सुरू राहिल्यामुळे विस्कळीत झालेली उद्योगांची गाडी रुळावर येण्यासाठी थोडा फार उपयोग होईल, अशी उद्योग क्षेत्राची अपेक्षा आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com