प्रवाशांना दिलासा! पुणे विमानतळ 1 डिसेंबरपासून 24 तास होणार खुला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

airport

येत्या एक डिसेंबरपासून 24 तासांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रवाशांना दिलासा! पुणे विमानतळ 1 डिसेंबरपासून 24 तास होणार खुला

पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे हा विमानतळ येत्या एक डिसेंबरपासून 24 तासांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. हवाईदलाने सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्याच्या कामाला प्रारंभ केला. त्यासाठी रात्री आठ ते सकाळी आठ दरम्यान विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. काम अंतिम टप्प्यात आल्यावर गेल्या महिन्यात सुमारे पंधरा दिवस विमानतळ बंद ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विमानतळ पूर्ण क्षमतेने पूर्ण वेळ कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले होते.

हेही वाचा: विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार आहे; पण कुठे होणार...

पुणे विमानतळावरून धावपट्टीच्या कामामुळे विमान वाहतुकीला मर्यादा आली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत होते. त्यांना मुंबई अथवा हैदराबादच्या विमानतळावरून इच्छित स्थळी जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.

हेही वाचा: पुणे विमानतळ कोरोनाशी लढा देण्यासाठी सज्ज, अशी तयारी...

विमानतळ प्रवाशांसाठी पूर्णवेळ खुला व्हावा, यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर या संघटनेचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनीही पाठपुरावा केला होता. मात्र, विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हवाई दलाकडून ते पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतरच पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमाने येऊ शकतील.

loading image
go to top