esakal | लोहगावातील लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी, राजकीय मंडळींचा केंद्रावर हस्तक्षेप
sakal

बोलून बातमी शोधा

lohegaon vaccine

लोहगाव येथील पुणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर सावळा गोंधळ सुरू आहे.

लोहगावातील लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी, राजकीय मंडळींचा केंद्रावर हस्तक्षेप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वडगाव शेरी : लोहगाव येथील पुणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर सावळा गोंधळ सुरू आहे. लसीकरणासाठी टोकण वाटप सकाळी नऊ वाजता होईल अशी सूचना लिहून प्रत्यक्षात पहाटेच ओळखीच्या लोकांना वशील्याने टोकन वाटले जात असल्याचा प्रकार आज नागरिकांनी उघडकीस आणला. लोहगाव येथील लसीकरण केंद्रावर अनेक जेष्ठ नागरिक टोकन घेण्यासाठी सकाळी नऊ वाजता उपस्थित झाले. मात्र पहाटे पाच वाजताच शंभर टोकण वाटून संपल्याची माहिती त्यांना येथील कर्मचाऱ्यांनी दिली. लसीकरण केंद्राशेजारील  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडे काल हे टोकण वाटण्यासाठी देण्यात आले होते. त्यांच्यामार्फत हे टोकन कोणी दूधवाल्याने परवानगी न घेताच पहाटे वाटले. त्यामुळे वेळेवर येऊन रांगेत थांबलेले नागरिक टोकण न मिळाल्याने संतप्त झाले. 

- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तसेच काही राजकीय  कार्यकर्ते  या लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापनात अनधिकृतपणे हस्तक्षेप करून लसीकरण केंद्रावर विनापरवानगी फिरत असल्याचे दिसले. याबाबत नागरिक राजेंद्र उजेणे, उदय बेंद्रे, महेश गौडेलर आदींनी या सर्व प्रकाराचा आरोग्य अधिकाऱयांना जाब विचारला. परिणामी या केंद्रावर बराच वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. विभागीय आरोग्य अधिकारी आणि उपायुक्त यांनी संबंधित केंद्रावर सुरू असलेल्या प्रकाराची माहिती घेतली. आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झालेली चूक मान्य केल्यानंतर हा गोंधळ निवळला.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थानिक आरोग्य निरीक्षक लतिका तामणार म्हणल्या, उद्यापासून नियमाप्रमाणे सकाळी नऊ वाजता टोकन वाटप केले जाईल.  कोणतीही वशिलेबाजी होणार नाही. पहाटे टोकण वाटण्याचा प्रकाराची चौकशी करु. तसेच उद्यापासून आरोग्य अधिकार्‍यांची सही, शिक्का आणि तारीख असलेले टोकन रांगेतील नागरिकांनाच वाटण्यात येतील. आज सकाळी नऊ वाजता आलेल्या नागरिकांचे लसीकरण आजच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी देवकाते यांनी यावेळी दिले.

loading image