Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

Pune Drug Case : बंगल्याच्या गार्डनमध्ये गांजाची तब्बल ४१ झाडे लावलेली आढळली. गांजाच्या विक्रीसाठी वापरले जाणारे ९ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. आरोपीने बंगला भाड्याने घेतला होता आणि गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
Police raid at a rented bungalow in Pune’s Lohgaon area reveals illegal ganja cultivation with 41 cannabis plants seized along with mobile devices.

Police raid at a rented bungalow in Pune’s Lohgaon area reveals illegal ganja cultivation with 41 cannabis plants seized along with mobile devices.

esakal

Updated on

पुण्यातील वारजेत नुकतेच ड्रग्जचे रॅकेट समोर आले असतानाच लोहगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने बंगल्याच्या आवारात गांजाची लागवड केली आहे. पोलिसांना बंगल्यात गांजाची ४१ झाडे आढळून आली असून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गांजाची विक्री करण्यासाठी वापरले जाणारे ९ मोबाईल हस्तगतही करण्यात आले आहे. हर्ष भरतकुमार पांचाल (वय ३०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com