Pune BJP Protest: पुण्यात मतदानादरम्यान भाजपचे आंदोलन, पदाधिकाऱ्यांचा भरचौकात ठिय्या; वाचा काय आहे नेमका प्रकार

Pune Loksabha Election 2024: 11 तारखेला प्रचार संपलेला असताना आज मतदानादिवशी विरोधी पक्षातील उमेदवाराच्या बूथवर त्यांचे नाव आणि चिन्ह झळकत आहे. हे लोकशाही विरोधात आहे.
Pune Loksabha BJP Protest Against Ravindra Dhangekar
Pune Loksabha BJP Protest Against Ravindra DhangekarEsakal

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान पुण्यातील फडके हौद परिसरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्र परिसरात काँग्रेसचे बॅनर असल्याने आक्षेप घते रस्त्यावर आंदोलनाला सुरूवात केली आहे.

यावेळी भाजप नेते आणि स्थायी समितीचे माजी सभापती हेमंत रासणे यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलनाला सुरूवात केली.

आज सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर फडके हौद परिसरात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या बूथवर त्यांच्या नावाचा बॅनर आणि पक्षाचे चिन्ह असलेला फलक लावल्याने भाजपने यावर आक्षेप घेतला व तेथेच खाली बसून आंदोलनाला सुरूवात केली.

यावेळी या प्रकरणावर बोलताना भाजप नेते हेमंत रासणे म्हणाले, 11 तारखेला प्रचार संपलेला असताना आज मतदानादिवशी विरोधी पक्षातील उमेदवाराच्या बूथवर त्यांचे नाव आणि चिन्ह झळकत आहे. हे लोकशाही विरोधात असून, त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.

Pune Loksabha BJP Protest Against Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

यादरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, साधारण दोन वर्षांपूर्वी कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासणे आणि सध्याचे आमदार व काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये धंगेकर जायंट किलर ठरले होते. तसेच त्यांनी अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला खिंडार पाडले होते.

Pune Loksabha BJP Protest Against Ravindra Dhangekar
Pune Voting : मिळकतकराचे बिल पाठवताना नाव असते पण मतदानाच्या यादीत नाव नाही, पुण्यात मतदार आजींचा संतप्त सवाल

लोकसभा निवडणुकांसाठी आज राज्यातील 11 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये पुण्याच्या जागेचाही समावेश आहे.

पुण्यातून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत पुण्याची जागा मिळवण्यासाठी चंग बांधला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com