

Lokmanyanagar redevelopment protest intensifies as Pune citizens demand transparency and housing rights.
Sakal
पुणे : लोकमान्यनगर येथील सोसायट्यांच्या पुनर्विकासावर अद्याप तोडगा न निघाल्याने येथील नागरिकांमधील असंतोष वाढत चालला आहे. राज्य सरकारकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या विरोधात लोकमान्यनगर बचाव कृती समितीतर्फे दत्त मंदिर चौकात आज (ता. ११) नागरिकांनी आंदोलन केले. या घंटानाद आंदोलनात थाळ्या, घंटा, काळे झेंडे आणि काळ्या कपड्यांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.