Pune Loksabha: मतदानाचा वाढलेल्या टक्का कोणाला तारणार? चुरशीच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला

Kothrud Lok Sabha Constituency: यंदा भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची निवडणूक दिसत असताना कोथरूडमधून भाजपला किती मताधिक्य मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.
Pune Loksabha Election|Kothrud Lok Sabha Constituency
Pune Loksabha Election|Kothrud Lok Sabha ConstituencyEsakal

पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आल्याने यंदा गेल्या वेळेपेक्षा २.१७ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. २ लाख १७ हजार ४५५ मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये कोथरूडने भाजपला साथ दिली आहे. २०१९ च्या निवडणुकीत तब्बल १ लाख ६ हजारांचे मताधिक्य तत्कालीन भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना मिळाले होते. यंदा भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची निवडणूक दिसत असताना कोथरूडमधून भाजपला किती मताधिक्य मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. कोथरूडमध्ये काँग्रेस भाजपला किती मतांवर रोखणार यावर लोकसभेचा निकाल ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत कष्टकरी, मध्यमवर्गीय मतदारांमध्ये धंगेकर यांच्याच नावाची चर्चा दिसली. कोथरूडमध्ये उच्चभ्रू, मध्यमवर्गीय मतदार मोठ्या प्रमाणात आहे, तर झोपडपट्ट्यांची संख्या जास्त असून, कष्टकऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. २०२४ च्या निवडणुकीत गरीब आणि श्रीमंत असा नेरेटिव्ह सेट करून वस्ती, झोपडपट्टीमध्ये धंगेकरांना पसंती मिळत आहे. सोसायटीमधील मतदार मोहोळांच्या बाजूने आहेत, अशी चर्चा घडविण्यात आली. मात्र कोथरूडमध्ये झोपडपट्टीसह सोसायट्यांमधून कायम भाजपला साथ मिळाली आहे. त्यामुळे यंदा किती मतदान धंगेकरांकडे जाणार याची उत्सुकता आहे.

Pune Loksabha Election|Kothrud Lok Sabha Constituency
Pune Loksabha: धंगेकर की मोहोळ? कँटोन्मेंटमधील 'हे' गणित ठरवणार कोणत्या उमेदवाराला मिळणार आघाडी

शीवतीर्थनगर, किष्किंधानगर, शास्त्रीनगरचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक १० मध्ये ५७.६८ टक्के मतदान झाले आहे. केळेवाडी, एमआयटी, हनुमाननगर, रामबाग कॉलनी, सुतारदरा या प्रभाग क्रमांक ११ मध्ये ५४.६८ टक्के मतदान झाले आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील वनाज कॉर्नर, गुजरात कॉलनी, भेलकेनगर, कोथरूड गावठाण मंत्री पार्क या भागात ५९.१० टक्के मतदान झाले आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील लॉ कॉलेजे, एसएनडीटी, पटवर्धन बाग, गिरिजा शंकर विहार या भागात ५९.५५ टक्के झाले आहे. कर्वेनगर, गोसावी वस्ती, शाहू कॉलनी, श्रमिक वसाहत प्रभाग क्रमांक ३१ मध्ये ५४.३२ टक्के मतदान झाले आहे, तर बाणेर, बालेवाडी, पाषाण, लमाणतांडा या भागात ४४.६९ टक्के मतदान झाले आहे.

Pune Loksabha Election|Kothrud Lok Sabha Constituency
Lok Sabha Election: मध्य वस्तीतील पेठांवर ठरणार कसब्याचा कौल, कसं आहे लोकसभेचं गणित

बाणेर, बालेवाडीत, पाषाण, सानेवाडी, सोमेश्‍वरवाडी, पंचवटी, लमाणतांडा, चतुःशृंगी, गोखलेनगर या भागात सुमारे १ लाख ४७ हजार मतदार आहेत. यातील बहुतांश भाग सोसायट्यांचा असून, काही ठिकाणी वस्ती आहे. राज्यासह देशभरातून नोकरीसाठी आलेल्या नागरिकांची संख्या या परिसरात अधिक आहे. लोकसभेसाठी सोसाट्यांमधील नागरिक मतदानासाठी बाहेर पडले, तर वस्ती भागातील कष्टकरी वर्गाने मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. या भागातून ६५ हजारांपेक्षा जास्त मतदान झाले आहे.

महत्त्वाचे असे काही

  • सर्वाधिक मतदार असलेला दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ

  • या भागातून महापालिकेत सर्वाधिक भाजपचे नगरसेवक

  • काँग्रेसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बळ मिळाले

  • भाजपला मनसेच्या इंजिनाची साथ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com