पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या होणार पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

local train
पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या होणार पूर्ववत

पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या होणार पूर्ववत

पुणे - पुणे-लोणावळादरम्यान (Pune-Lonavala) धावणाऱ्या लोकल (Local) फेऱ्यांच्या संख्येत महिन्यात वाढ होणार आहे. सध्या दिवसभरात २६ फेऱ्या होत असून यात वाढ होऊन ती संख्या ४२ इतकी होणार आहे. कोविडपूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान ४२ लोकल धावत होत्या. पुन्हा दिवसभरात लोकलच्या ४२ फेऱ्या होणार असल्याचे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

कामशेत रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्गाचे काम सुरु आहे. हे काम संपल्यानंतर लोकलच्या फेऱ्या वाढतील. महिन्याभराच्या आतच लोकल पूर्ववत होणार आहे.

सध्याची स्थिती

  • २६ - सध्या लोकल फेऱ्या

  • २० ते ३० हजार - प्रवासी संख्या

कोरोनापूर्वी

  • ४२ - लोकल फेऱ्या

  • सुमारे १ लाख - प्रवासी संख्या

लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्ण क्षमतेने लोकल सुरू झाल्यास प्रवाशांना नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल. सकाळी व रात्रीच्या वेळी लोकलच्या फेऱ्या वाढणे गरजेचे आहे. लोकल सेवा पूर्ववत होताना याचा विचार केला जाईल.

- मयूरेश झव्हेरी, सचिव, पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटना, पुणे

पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांत वाढ केली जाणार आहे. कामशेत स्थानकाजवळचे काम पूर्ण झाल्यावर लोकलच्या फेऱ्या वाढविल्या जातील.

- ब्रिजेशकुमार सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

Web Title: Pune Lonavla Local Trains Will Be Resumed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneLocal Trainlonavala
go to top