
पुणे : लोणी रेल्वे स्टेशन येथे रेल्वेच्या अपघातात दोघांचा मृत्यू
लोणी काळभोर : लोणी रेल्वे स्टेशन येथे रेल्वेच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. चंद्रकांत शनीचर चव्हाण (अंदाजे वय- ५०, राहिंज वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) आणि राम पुकार (वय-२२, रा. उत्तर प्रदेश) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत चव्हाण हे लोणी काळभोर परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चव्हाण हे लोणी स्टेशन येथील रेल्वे लाईन ओलांडताना सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या हैद्राबाद एक्सप्रेसने धडक दिली. यामध्ये चव्हाणचा जागीच मृत्यू झाला.
तर दुसऱ्या घटनेत दौंड कडून पुण्याच्या दिशेने चाललेल्या जेसीडी एक्सप्रेस मधून परप्रांतीय मजूर राम पुकार दरवाजात बसून चालला होता. पुकार हा बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लोणी स्टेशन येथे जेसीडी गाडीतून खाली पडला. यामध्ये पुकारचाही जागीच मृत्यू झाला आहे.
Web Title: Pune Loni Railway Station Two Death In Train Accident
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..