

पुणे, ता. ९ ः प्रियकराने ब्लेडने गळा चिरल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या गुन्ह्यात प्रियकराला अटक करण्यात आली असून आता त्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर दिलीप राठोड (वय २२, रा. हिंगोली) याला अटक करण्यात आली. याबाबत उजालादेवीचा भाऊ भगतसिंग (वय २५) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी राठोडवर सुरुवातीला मारहाणीचा व खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. आता त्यात कमलवाढ करत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजालादेवी आणि आरोपी राठोड हे विमाननगरमधील एका माॅलमध्ये काम करत होते. काम करताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. २९ एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास राठोड हा चंदननगरमधील पठारे वस्ती परिसरात आला. उजालादेवीचा भाऊ आणि वहिनी हे कामावर गेले होते. राठोड तरुणीच्या घरात शिरला. त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्या वादातून राठोडने ब्लेडने तिचा चिरला आणि तेथून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या उजालादेवीला तातडीने रहिवासी आणि पोलिसांनी सुरुवातीला ससून रुग्णालयात दाखल केले. तिने भावाला या घटनेची माहिती दिली.
तीने दिला होता विवाहास नकार ः
उजालादेवी गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. ८) तिचा मृत्यू झाला. पसार झालेल्या राठोडला हिंगोली परिसरातून अटक करण्यात आली होती. उजालादेवीने विवाहास नकार दिला होता. तिचा विवाह ठरला होता. तेव्हापासून राठोड तिच्यावर चिडला होता. त्यांच्यात वाद व्हायचे. वादातून त्याने तिचा ब्लेडने गळा चिरला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.