
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या (आयआयए) महाराष्ट्र चॅप्टर आणि पुणे केंद्रातर्फे ‘महाकॉन २०२२’ या दोनदिवसीय परिषदेला शुक्रवार (ता. २९)पासून सुरुवात होणार आहे.
पुणे - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या (आयआयए) (IIA) महाराष्ट्र चॅप्टर आणि पुणे केंद्रातर्फे ‘महाकॉन २०२२’ (Mahacon 2022) या दोनदिवसीय परिषदेला (Conference) शुक्रवार (ता. २९) पासून सुरुवात होणार आहे. बाणेरमधील बुंतारा भवनमध्ये सकाळी ११ वाजता ही परिषद होणार आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे तज्ज्ञ आर्किटेक्ट्स या परिषदेच्या माध्यमातून व्यावसायिकांसह विद्यार्थी, प्राध्यापक व नवोदित व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता. २९) अहमदाबाद येथील आर्किटेक्ट बिमल पटेल यांचे बीज भाषण होईल. मुंबईचे आर्किटेक्ट कृष्णमूर्ती, तसेच महेश नामपूरकर यांची व्याख्याने होणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ३०) पहिल्या सत्रात नवी दिल्ली येथील आर्किटेक्ट सोनाली रस्तोगी यांचे बीजभाषण होईल. त्यानंतर कोचीचे आर्किटेक्ट ललिचन जकारिया व मुंबईचे आर्किटेक्ट बारिश दाते यांची व्याख्याने होणार आहेत. या परिषदेसाठी ५०० हून अधिक व्यावसायिकांनी तर ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून राज्यभरातून ३०० हून अधिक वास्तुविशारद यामध्ये सहभागी होतील, अशी माहिती संयोजन समितीने दिली.