Pune : महंमदवाडी-हांडेवाडी रस्ता पालिकेकडून दुर्लक्षीत

महंमदवाडी ते हांडेवाडी हा रस्ता सुमारे दीड-दोन किलोमीटरचा आहे.
रस्ता
रस्ता sakal
Updated on

हडपसर : आगोदरच अरूंद, त्यातच वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे, काँक्रीट तटून पडलेल्या भेगा, डांबर उडून उघडी पडलेली खडी, त्यामुळे ठिकठिकाणी निर्माण झालेले खड्डे आणि अनेक ठिकाणी दुतर्फा पडलेला राडारोडा यामुळे महंमदवाडी ते हांडेवाडी रस्त्याची वाट लागून तो वाहतुकीला धोकादायक झाला आहे. अशी परिस्थिती असतानाही पालिकेकडून मात्र या गोष्टीकडे मोठ्याप्रमाणात दुर्लक्ष होत आहे.

रस्ता
Pune: 'डिजेचा आवाज अन् कोयत्याचा वार' अपमान सहन न झाल्याने वृद्धाची नदीत उडी मारून आत्महत्या

महंमदवाडी ते हांडेवाडी हा रस्ता सुमारे दीड-दोन किलोमीटरचा आहे. न्याती चौकापासून पुढे असलेली शाळा व दीघे उद्यानापर्यंत डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, त्यापुढील कात्रज-मंतरवाडी बायपास पर्यंतचा संपूर्ण रस्ता वाहतुकीला धोकादायक झाला आहे. न्याती ईनक्लेव परिसरात हा रस्ता अरूंद आहे. काही अंतरापर्यंत काँक्रीटचा असलेला हा रस्ता ठिकठिकाणी तुटला आहे. काही झाडे रस्त्यात आलेली आहेत.

साईडपट्ट्या उघड्या पडल्या आहेत. त्यापुढील रस्ता केवळ नावालाच डांबरी दिसत आहे. खडी उघडी पडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर गोदामे असल्याने जड वाहतूक मोठ्याप्रमाणात होत आहे. त्यामुळे रस्ता दिवसेदिवस अधिकच नादुरुस्त होत चालला आहे. रस्त्याच्या दोन्हीही बाजूला ठिकठिकाणी राडारोडा व कचऱ्याचे ढीग लागले आहेत. बायपास मार्गाच्या परिसरात केवळ नावालाच रस्ता उरला आहे.

येथे दगडगोटे व खडी मातीचे साम्राज्य पाहवयास मिळत आहे. या सर्व धोकादायक मार्गातून प्रवास करताना दुचाकी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशी तक्रार शारदा वाल्हेकर, शोभा मोझे, शिल्पा राव, आशिष मोमया, त्या जस भानगिरे, मंदेश चव्हाण यांनी केली आहे.

रस्ता
Pune : टिंबर मार्केटचे होणार स्थलांतर ?

"जवळचा मार्ग असल्याने या रस्त्याने मोठ्याप्रमाणात वाहतूक वाढली आहे. मात्र, गेली अनेक वर्षांपासून रस्त्याची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. प्रवाशांचे त्यामुळे मोठे हाल होत आहेत. पालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याचे काम त्वरित सुरू न केल्यास आम्ही महिला रस्त्यावर उतरू.'

स्वाती कुरणे, अध्यक्षा, हडपसर विधानसभा भाजपा महिला आघाडी

"महंमदवाडीच्या बाजूने हांडेवाडीकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या कामाचे टेंडर झाले आहे. काही ठिकाणी अरुंद असलेला रस्ता रूंद करून दुरूस्तीचे कामही पुढील काही दिवसात करण्यात येणार आहे.'

अविनाश कामठे, उप अभियंता, महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Akola News
Nanded News
Climate change and geomagnetic shifts
Accident Prone Roads: Loose Gravel and Sand on Key Arteries Lead to Two-Wheeler Skids
Marathi News Esakal
www.esakal.com