

Concerns Over Privatization of State Hospitals
Sakal
पुणे : राज्यातील ३६ वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांद्वारे दररोज हजारो रुग्णांना बाह्यरुग्ण विभागापासून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागातील उपचार, आव्हानात्मक उपचारांची सेवा अत्यल्प दरात मिळते. मात्र, या रुग्णालयांच्या सेवा हळूहळू सार्वजनिक खासगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप-पीपीपी) तत्त्वावर कंपन्यांकडे सोपविल्या जात आहेत. अशा प्रकारे खासगीकरणाच्या दिशेने या विभागाची वाटचाल सुरू झाल्याने त्यावर आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.