

Strict Security for Maharashtra TET Exam
Sakal
पुणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान (टीईटी) परीक्षा केंद्रात प्रवेश करताना परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व परीक्षार्थींचे मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने ‘फ्रिस्किंग’ केले जाणार आहे. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कोणताही विद्यार्थी मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या उपाययोजना केल्या आहेत. ‘टीईटी’ परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने यंदा काटेकोर उपाययोजनांवर भर दिला आहे.