
पुणे: महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पुणे शहर, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात मिळून २०० रुग्णालये तर मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत ४४५ रुग्णालये आहेत. मात्र, रुग्णालयांची आणखी ही संख्या वाढावी यासाठी पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांची बेडची क्षमता, मनुष्यबळ, आवश्यक कागदपत्रे यांच्या तपासणीसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक असून त्यांच्याकडून ही तपासणी करण्यात येत आहे.