Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; सून जागीच ठार तर सासरा गंभीर जखमी

Pune Accident: वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु केला आहे. हा अपघात नेमका कसा झाला अद्याप समोर आलेले नाही. भरचौकात हा अपघात घडल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे वाहतूक कोंडी झाली.
A tragic Pune accident involving a bike and truck leads to a woman's death. Keywords: Pune Accident, Bike Truck Collision, Woman Death.
A tragic Pune accident involving a bike and truck leads to a woman's death. Keywords: Pune Accident, Bike Truck Collision, Woman Death.esakal
Updated on

पुण्यातील गंगाधाम चौकात बुधवारी सकाळी सिग्नल सुटताच पुढे निघालेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा जागीच मृत्यू आला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू व जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गंगाधाम चौकात ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com