Pune : माळेगावकर निवडणुकीच्या आगोदरच गेले गोंधळून

निवडणूक आयोगानेही माळेगाव वगळता राज्यातील इतर नगरपंचायतीच्या निवडणूकीचा प्रोगाम जाहिर केला.
Pune : माळेगावकर निवडणुकीच्या आगोदरच गेले गोंधळून
Pune : माळेगावकर निवडणुकीच्या आगोदरच गेले गोंधळून sakal

पुणे (माळेगाव) : माळेगाव बुद्रूकचा पहिला नगराध्यक्ष व नगरसेवक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आरक्षण सोडतीनुसार सध्याला आपापल्या प्रभागात मतदारांची मते जाणून घेण्यास सुरूवात केली आहे, तर दुसरीकडे माळेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतमीमध्ये करताना शासानाच्या नगरविकास खात्याने नियमाची पायमल्ली केली, हे कारण पुढे करीत भाजप विचाराच्या माजी सरपंचाने सदरची निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. परिणामी निवडणूक आयोगानेही माळेगाव वगळता राज्यातील इतर नगरपंचायतीच्या निवडणूकीचा प्रोगाम जाहिर केला. सहाजिक या प्राप्त स्थितीमुळे माळेगावकरांसह इच्छुक उमेदवार सध्याला पुर्णतः गोंधळून गेल्याचे चित्र दिसून येते. 

बारामती तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीच्यानिमित्ताने निवडून आयोगाच्या सुचनेनुसार प्रशासनाने गावात १७ प्रभागनिहाय आरक्षण सोडत व प्रभाग रचना निश्चित केली. तसेच प्रारूप मतदार यादीही जाहिर केली. याच वेळी माळेगावचे भाजप विचाराचे कार्य़कर्ते व माजी सरपंच जयदीप विलास तावरे यांनी नगरविकास खात्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती पुढे आली. त्या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एस. जे. खातवाला, एम.एन.जाधव यांच्या खंडापीठासमोर तातडीने होण्यासाठी याचिकाकर्ते तावरे प्रयत्नशिल आहेत.

Pune : माळेगावकर निवडणुकीच्या आगोदरच गेले गोंधळून
'२३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की...' NCP चा राणेंवर प्रहार

दरम्यानच्या कालावाधित (बुधवार ता. २४) राज्य निवडणूक आयोगाने सचिव किरण करूंदकर यांनी राज्यातील १०५ नगपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा प्रोग्राम जाहिर केला. त्यामध्ये माळेगावचा समावेश दिसून आला नाही. सहाजिकच माळेगावच्या निवडणूकीपुढे पेच प्रसंग निर्माण झाल्याने इच्छुक उमेदवारांसह गावकरी मात्र पुर्णतः गोंधळून गेले आहेत. दरम्यान, माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीला आडथळा आणणाऱ्या भाजपच्या कार्य़कर्त्यांच्या दुटप्पी धोरणाला राष्ट्रवादीचे कार्य़कर्तेंनीही जशासतसे उत्तर देण्याची तयारी न्यायालयात सुरू केली आहे. ``माळेगाव नगरपंचायतीचा विजय असो`` असा जयघोष करीत माळेगावकरांसह याचिकाकर्त्यांनी स्वतःहून डिसेंबर २०२० मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक नाकारली होती. आता पुन्हा ग्रामपंचायत प्रशासन हवे, असे म्हणून न्यायालयात नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया वेटीस धरणे कितपत योग्य आहे, असा सवाल राष्ट्रवादीच्या कार्य़कर्त्यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीने उपस्थित केले मुद्दे...

नोव्हेंबर 2020 मध्ये माळेगाव ग्रामपंचायत निवडणूक नाकारण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीला याचिकाकर्ते उपस्थित असणे, ग्रामपंचायत निवडणूकीतून याचिकाकर्त्यांसह सर्वपक्षिय ७६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची शासनस्तरावर नोंद, ग्रामपंचायत निवडणूक नाकारल्यानंतर नगरपंचायतीच्या जयघोष करताना याचिकाकर्त्यांचे व्हायरल झालेले छायाचित्र, नगरपंचायत अस्तित्वात येण्याकरिता शासनास प्रस्ताव पाठविला गेला त्यावेळी ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती असणे, कोणत्याही ग्रामपंचायतची लोकसंख्या १५ हजारांपेक्षा अधिकचीअसेल अशा ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा अधिकार सर्वस्वी शासनाचा असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com