
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यातील अनेक भागात वाहतूक कोंडीही झाली आहे. दरम्यान, झाडं कोसळल्याच्या घटनाही घडत आहेत. कर्वेनगर परिसरात झाड कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडलीय. समर्थ पथावर एका तरुणाचा झाड कोसळून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव राहुल जोशी असं आहे. सिंहगड रोड परिसरात जाण्यासाठी दुचाकीवरून राहुल जोशी निघाले होते. त्यावेळी अचानक झाड डोक्यावर कोसळले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.