

Farukh Sheikh Named In 30 Page Suicide Note In Pune
Esakal
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू असताना पुण्यात धक्कादायक घटना घडलीय. हडपसरमधील एका व्यक्तीनं आत्महत्या केली असून सुसाइड नोटमध्ये अजित पवार यांच्या उमेदवाराचं नाव लिहिल्यानं खळबळ उडालीय. सादिक उर्फ बाबू कपूर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यानं हातावर आणि कागदावर सुसाइड नोट लिहिली असून त्यात अनेकांची नावं लिहिण्यात आली आहेत. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हडपसरमधील एका उमेदवाराचं नाव आहे.