
पुणे जिल्ह्यातील कडूस (ता. खेड) गावात जुना वाद उफाळून आल्याने एका 40 वर्षीय तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणातील जुन्या वादातून दोन आरोपींनी मिळून हा खून केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खून आणि शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.