मंचर: सामान्य रुग्णालयासाठी ८६.५५ कोटी रुपये निधी मंजूर - वळसे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामान्य रुग्णालय

मंचर: सामान्य रुग्णालयासाठी ८६.५५ कोटी रुपये निधी मंजूर - वळसे पाटील

मंचर : “तांबडेमळा- मंचर (ता.आंबेगाव) येथील सामान्य रुग्णालयाच्या मुख्य इमारत आणि निवासस्थान बांधकामासाठी ८६ कोटी ५५ लाख ३० हजार रुपये रकमेस प्रशासकीय राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली.

मंचर येथे कार्यरत असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास शासनाने विशेष बाब म्हणून यापूर्वीच मान्यता दिली होती. या रुग्णालयासाठी आवश्यक असलेली इमारत तसेच रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान बांधण्यासाठी अर्थसंकल्पाव्दारे निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे वळसे पाटील यांनी केली होती.

हेही वाचा: करवत रे करवत आणि भगवती देवीची होळी आली रे मिरवत होलीss ओ

“आंबेगाव व शिरूर तालुक्याची व परिसराची रुग्णालयाची गरज लक्षात घेवून शासनाने या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याचे मान्य केले. भविष्यकाळात मंचर येथे रुग्णांसाठी आणखी १०० खाटांची उपलब्धता होणार आहे. सामान्य रुग्णालयामुळे आंबेगाव, शिरूर तालुका व परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील.”असे वळसे पाटील यांनी सांगितले.

“मंचर उपजिल्हा रुग्णालयाची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालयासाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत तांबडेमळा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात साडेसात एकर जागा उपलब्ध झाली आहे. येथे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरु होईल. या भागातील रुग्णांना पुणे-मुंबईला जाण्याऐवजी येथेच सर्व प्रकारचे उपचार मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे.”

-दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री.

Web Title: Pune Manchar General Hospital 8655 Crore Fund Dilip Valse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsmanchar
go to top