Pune : मंडईतील वाहनतळ महिलांसाठी धोकादायक; नगरसेविकेचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Mandai

Pune : मंडईतील वाहनतळ महिलांसाठी धोकादायक; नगरसेविकेचा आरोप

पुणे : महात्मा फुले मंडई येथील महापालिकेच्या बाबू गेनू (आर्यन) वाहनतळाबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असताना त्यावर थेट कारवाई करण्यास प्रशासन हिंमत दाखवत नाही. आता मात्र महापालिकेच्या मुख्य सभेत थेट भाजप नगरसेविकेनेच हे वाहनतळ धोकादायक असून महिलांची उद्धटपणे वर्तन केल्याचा आरोप मुख्य सभेत केला.

बुधवार पेठे बाबू गेनू वाहनतळाची फेर निविदा काढण्यासाठी मुख्य सभेची मान्यता देण्याचा प्रस्ताव सभागृहात करण्यात आला त्यावेळी भाजप नगरसेविका उज्वला जंगले यांनी येथील कर्मचा-यांच्या वर्तणूक चा मुद्दा सभागृहात उपस्थित केला

उज्वला जंगले म्हणाल्या, " शहराच्या अनेक भागातून अनेक महिला शाॅपिंगला मंडई परिसरात येतात. त्यावेळी मंडईतील हे वाहनतळ महिलांना सुरक्षा नाही. जास्त पैसे घेतले जातात, ठेकेदाराचे लोक नागरिकांच्या अंगावर धावून जातात. महिलांशी उद्धटपणे वागतात.

विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी हा विषय गंभीर आहे, त्याला काम न देण्यासाठी फेरविचार करावाकरावा अशी मागणी केली. तसेच वाहनतळ ठेकेदारांचे लाखो रुपयांचे भाडे थकलेले आहे, असे सांगितले.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

प्रशांत जगताप म्हणाले, पार्किंगवाले तिप्पट चौपट पैसे घेत आहेत. त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही.

विरोधकांकडून वाहनतळाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असताना भाजपने मात्र यावर जास्त चर्चा होउ नये यासाठी नगरसेवकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, या विषयाची माहिती देण्यासाठी अधिकारी नाहीत. शहरात पार्किंग अनेक आहेत, त्यांचे अनेक प्रश्न आहेत याबद्दल पुढील सभेत खुलासा केल्यानंतरच नवीन काम देण्याचा विचार केला जाईल."

loading image
go to top