

DCP Shinde's Strict Order Against Loud Bullet Riders
Sakal
मांजरी : आवाज काढणाऱ्या बुलेट राजांना शोधून काढा, त्यांचे सायलेंसर काढून रोडरोलरखाली नष्ट करा, या राजांची वरात काढून त्यांना त्यांच्या आईवडिलांसमोर चांगला धडा शिकवा, असा आदेश अधिकाऱ्यांना देत मांजरी परिसरातील पोलिसांशी संबंधित समस्या पंधरा दिवसांत सोडवू,' असे आश्वासन पोलिस उपायुक्त (झोन ५) डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिले.