मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार; राजकीय पक्षाच्या कार्यालयांवर करणार 'आक्रोश आंदोलन'!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी बुधवारी (ता.२३) पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुणे : मराठा आरक्षणाबाबतची वस्तुस्थिती सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना कळावी आणि सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे, या उद्देशाने पुणे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येत्या रविवारी (ता.२७) प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. 

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी बुधवारी (ता.२३) पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा क्रांती मोर्चाचे बाळासाहेब अमराळे, तुषार काकडे, हनुमंत मोटे, सचिन आडेकर, प्राची दुधाने आदी उपस्थित होते.

बेरोजगारांना मिळणार पगाराच्या ५० टक्के भत्ता​ 

रविवारी सकाळी साडेदहा वाजता पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर, सकाळी सव्वाअकरा वाजता शिवसेनेच्या डेक्कन जिमखाना येथील कार्यालयासमोर, दुपारी बारा वाजता भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयसमोर, तर दुपारी साडेबारा वाजता काॅंग्रेस भवनासमोर हे आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Maratha Kranti Morcha will organize agitation in front of offices of political parties