

Pune theatres demand committee to resolve booking issues.
पुणे : महापालिकेने यावर्षी मार्चपासून नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रांच्या आरक्षणासाठी ‘रंगयात्रा’ हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले. मात्र त्यावेळी संपूर्णतः ऑनलाइन आरक्षणाला नाट्य व्यवस्थापक, संयोजक आणि निर्मात्यांनी विरोध केला होता. त्यामुळे पुढील दोन चौमाहींच्या आरक्षणासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन (प्रत्यक्ष) अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र आता संपूर्ण आरक्षण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.