
Market Yard Scam
Sakal
मार्केट यार्ड : फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा विभागातील ‘जी-५६’ या मोकळ्या जागांचा नियमबाह्य पद्धतीने वापर सुरू आहे. लिलाव प्रक्रिया न करताच १७ जागांचे केवळ पत्राद्वारे वाटप झाले आहे. तर, उर्वरित ३९ जागांवर गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय सुरू असून त्यातून मिळणारे भाडे नेमके कोणाच्या खिशात जात आहेत, याबाबत प्रशासन मौन बाळगून आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनीही पत्रकार परिषदेत मुद्दा उपस्थित केला होता.