

Pune Market Yard
Sakal
मार्केट यार्ड : कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील एका न्यायप्रविष्ट भूखंडावर पुन्हा ‘डाळिंब यार्ड’ उभारण्याचा घाट घातला जात आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे. याआधी राज्याच्या तत्कालीन पणन संचालकांनी ‘डाळिंब यार्ड’च्या या योजनेला पूर्वीच स्थगिती दिली आहे. तरीही ‘डाळिंब यार्ड’च्या नावाखाली पुन्हा कोट्यवधींचा भूखंड दिला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.