Pune Market Yard : पुणे बाजार समितीत राजकीय हेतूपोटी अनधिकृत व्यापाऱ्यांना फायदा; संचालकाचा राजीनामा

Agricultural Market : गुलटेकडी मार्केट यार्डातील संचालक अविनाश मोरडे यांनी राजीनामा देताना बेकायदेशीर व्यापाऱ्यांना राजकीय पाठबळ, अडत्यांना दुर्लक्ष व आर्थिक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
Pune Market Yard
Pune Market YardSakal
Updated on

मार्केट यार्ड : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील अडतदारांना सन्मानाने वागणूक दिली जात नाही, तसेच बेकायदा आणि चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या कांदा-बटाटा-लसूण विभागातून निवडून आलेले संचालक अविनाश मोरडे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा देताना हे आरोप केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com