

Increased Demand in Winter Season
Sakal
मार्केट यार्ड : हिवाळ्याची चाहूल लागताच सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाली आहे. आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, बेदाणे, अंजीर, खारीक आदी सुकामेव्याला मागणी आहे. यंदा उत्पादन समाधानकारक झाल्याने आणि काही वस्तूंवरील ‘जीएसटी’ कपात लागू झाल्यामुळे भाव तुलनेने घसरला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचीही खरेदी सुकर होत आहे.