
Pune markets shine bright as citizens shop for Lakshmi Puja essentials ahead of Diwali.
Sakal
पुणे/मार्केटयार्ड : दिवाळीनिमित्त घराघरांत उत्सवाचे, आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. घराघरांत लक्ष्मीपूजेची तयारी जोमात सुरू असून, बाजारपेठांमध्ये लक्ष्मीपूजेच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू असून आहे. मात्र या वर्षी पूजासाहित्याचे भाव काहीसे चढले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फुले, दिवे, अगरबत्त्या, रांगोळी आणि सजावटीच्या वस्तूंमध्ये ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे भक्तिभावासोबतच खर्चातही वाढ जाणवत आहे. ‘‘दर थोडे वाढले असले तरी खरेदीचा उत्साह तसाच आहे,’’ असे महात्मा फुले मंडईतील व्यापारी नीलेश जाधव यांनी सांगितले.