Pune Matrimonial Scam
esakal
ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून पुण्यातील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल ४२ लाख ६४ रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने स्वतःला ISRO मध्ये कार्यरत असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला. नंतर लग्नाचे आमिष देत तिच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचे उघड झाले आहे.